Top News

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे राजुरा येथे आयोजन.

Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा

राजुरा:- दिनांक ९/०८/२०२० रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या व रानफळे महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री कवडू पोटे पाटील चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा तसेच श्री सुनील उरकुडे सभापती कृषि व पशुसंवर्धन जिल्हा परिषद चंद्रपूर श्री मंगेश गुरुनुले उपसभापती पंचायत समिती राजुरा, सौ नलगे मॅडम जिल्हा परिषद सदस्य, सौ जनेकर , श्री वाघोजी गेडाम आदिवासी सेवक राज्य पुरस्कार प्राप्त, श्री रामभाऊ ढुमणे प्रगतशील शेतकरी, मा गोविंद मोरे उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा, मा. जी के कडलग तालुका कृषी अधिकारी राजुरा, श्री विठ्ठल मकपल्ले मंडळ कृषी अधिकारी राजुरा, श्री चेतन चव्हाण मंडळ कृषी अधिकारी देवाडा, श्री ढवस पंचायत समिती कृषी अधिकारी राजुरा, श्री संदीप दातारकर कृषी पर्यवेक्षक, श्री किशोर चंदनबटवे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजुरा व शेतकरी निसर्ग महिला बचत गट पंचाळा, समृद्धी स्वयंसहायता समूह महिला बचत गट विहीरगाव आणि कृषी विभागातील विविध अधिकारी कर्मचारी व कृषी मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते.

या प्रसंगी नलगे मॅडम यांनी भाज्यांचे आहारातील महत्व व विषमुक्त भाज्या असल्याचे सांगितले, उपसभापती मंगेश गुरनुले यांनी रानभाज्या अतिशय महत्वाच्या असून दरवर्षी या महोत्सवातून उपलब्ध व्हाव्यात अशी इच्छा वक्त केली. तद्नंतर गोविंद मोरे उप विभागीय कृषी अधिकारी,राजुरा यांनी पूर्वीचे आयुर्मान व आताचे आयुर्मान, पूर्वीचे रोग प्रतिकार क्षमता व सध्याची प्रतिकार क्षमता याविषयी अनुभव कथन केले व सर्वांनी आपापल्या परसबागेमध्ये सदरील रानभाज्या व रानफळे जतन करावे व त्यांचा आपल्या आहारात दररोज वापर करावा. विषयुक्त अन्न विषमुक्त कसे तयार करता येईल व खाता येईल व आहाराकडे कसे जातीने लक्ष देता येईल, रोग प्रतिकारक्षमता कशी वाढवता येईल याबाबत सविस्तर विवेचन केले.
त्यानंतर आदिवासी सेवक मा. वाघोजी गेडाम यांनी आदिवासी समाज दुर्लक्षित असून स्वतःसाठी आजही ते सदरील रानभाज्या सेवन करतो व निरोगी राहतो याबाबत आपली भूमिका मांढली व आदिवादी दिनानिमित्य त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गोपाल जांभुलकर व रुपेश गेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर मा. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कवडू पोटे यांनी अतीशय चांगला उपक्रम असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत समाधान व्यक्त करून अशा उपक्रमास वेळोवेळी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व याकार्यक्रमास सर्वांनी उपस्थिती दर्शविल्याबाबत समाधान व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री. किशोर चंदनबटवे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, प्रास्ताविक श्री जी के कडलग तालुका कृषी अधिकारी सूत्रसंचालन श्री संदीप दातारकर कृषी पर्यवेक्षक व आभारप्रदर्शन श्री चेतन चव्हाण मंडळ कृषी अधिकारी यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने