Click Here...👇👇👇

आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार.

Bhairav Diwase
आदिवासी समाजाचे नावलौकिक केले या सर्वांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Bhairav Diwase. Aug 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यात 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थांनी मेहनत, जिद्द,व चिकाटीमुळे यश संपादन केले असून आपल्या कुटुंबियांना ही गौरव प्राप्त करून दिले आहे.या विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्याकरिता त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड घुग्गुस यांच्यातर्फे सीबीएसई दहावी वर्गाची कु.शेजल मंगेश उईके 90.60 टक्के, निखिल एकनाथ घोडाम 84.20 टक्के व अतुल अर्जुन परचाके 83 टक्के गुण प्राप्त केले असून यांनी आदिवासी समाजाचे नावलौकिक केले या सर्वांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक तिरुमाल पुनाजी कोरचे, तिरुमाल अरुण पेंदोर, तिरुमाल दिलीप टेकाम, गणेश किनाके, दिपक पेंदोर, शैलेश सलामे, मनोज चांदेकर,व अरविंद कोवे कामगार उपस्थित होते.