Click Here...👇👇👇

भाजपा महिला आघाडी पोंभूर्णा च्या वतीने रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर कोविड-१९ योध्दाचा राखी बांधून आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- जगा सह भारत देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता शिपाई,बँक अधिकारी, तसेच अनेक अधिकारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कोरोना योध्ये म्हणून कार्यरत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडी मोर्चाच्या वतीने पोलिस स्टेशन उमरी पोतदार आणि प्रा. आ केंद्र नवेगाव मोरे येथे रक्षाबंधन आणि कोरोणा योद्धाचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित अल्का आत्राम सभापती रजिया कुरेशी उपनगराध्यक्ष सुनिता मँकलवार माधुरी मोरे पपिता पोलपोलवार रोशनी मुलकलवार मनिषा थेरे ठाणेदार नितावणे आणि पोलिस कर्मचारी डॉ शेख डॉ जोगंदड आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.