Bhairav Diwase. Aug 09, 2020
कोरपना:- गडचांदूर शहरातील शहीद क्रांतिवीर बाबुराव पुल्लेशवर शेडमाके स्मारक समिती यांच्या तर्फे ०९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पूजन करून हार माल्यार्पण नमन करून वृषरोपन कार्यक्रम घेण्यात आला. आज जागतिक आदिवासी दिन सम्पूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण या वर्षी कोरोना महामारीच्या विळख्यात अखं जग डगमगल त्यामुळे सम्पूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन सर्व साधारण पणे साजरा करण्यात आला. यात विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली त्यात उपस्थित महेश परचाके, स्वप्ननील आत्राम, प्रफुल कोटनाके , शंकर मडावी, शुभम आत्राम, स्नेहल अलाम, अमित कोरे, शंकर परचाके, सूरज सिडाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...