सावली तालुक्यातील पाथरी परिसरात जनावरांना साथीच्या रोगाची लागण.

Bhairav Diwase
उपाययोजना करण्याच्या खासदार अशोक नेते यांच्या सूचना.
Bhairav Diwase. Aug 17, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी परिसरातील पाथरी, बेलगाव, हिरापूर बोथली, चख विरखल,निमगाव निफन्द्रा इत्यादी गावांतील जनावरांना साथीच्या रोगाची लागण झालेली आहे ऐन शेतीच्या हंगामात जनावरांना साथ रोगाने ग्रासल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत याबाबतची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी तालुका प्रशासनास निर्देश देऊन सदर गावामध्ये पशु चिकित्सा शिबिरे आयोजित करून सर्व जनावरांचे तात्काळ लसीकरण करून साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या सूचना तालुका प्रशासनास दिल्या.
पाथरी परिसरात जनावरांना चौखुरा रोग व इतर साथरोग होण्याचे प्रमाण वाढत आहे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता खासदार अशोक नेते यांनी सावलीचे तहसीलदार व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांना दूरध्वनी करून सदर गावामध्ये शिबीर घेऊन त्वरीत जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश  दिले.