त्वरित खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- ग्रामीण भागातील जनतेचा शहराशी संपर्क व्हावा वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गाव तिथे रस्त्याची निर्मिती करण्यात आली मात्र सावली ला जोडनारा जिबगाव हरांबा मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्यामुळे प्रवाशी बेहाल झालेले आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सावली याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
संदर्भात प्रहार संघटनेतर्फे प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी सदर विभागाला निवेदन देवूनही व खड्याबाबत अनेक वृत्त प्रकाशित करूनही या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.
सदरच्या रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. गेल्या आठवड्याभरा पासून रिमझिम पावसाची झळ सुरू असून रस्त्यावर पडलेल्या खड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्याचा अंदाज समजला जात नसल्याने पाणी भरलेली खड्डे हे अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहे.त्यामुळे वाहतूक दारांना आपली वाहने काळजी पूर्वक नेल्याशिवाय पर्याय उरला नाही.तसेच आटो चे पट्टे तुटत असून वाहनांची मोठी नुकसान होत आहे. अशी रस्त्याची दुरवस्था आहे. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्याची डागडुगी तरी करून द्यावी अशी मागणी जोर धरत असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे. रस्त्यावरील मार्गाचे खड्डे भुजविले नाहीत तर आंदोलन करण्यात येईल,असा इशारा प्रहार संघटनेतर्फे प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी दिला आहे.
लवकरच खड्डे बुजविण्यात येईल-कटरे
रस्त्यावर खड्डे पडलेले आहे.या मार्गाचा नवीनिकरणासाठी मंजूर झालेला निधी हा परत गेला आहे.त्यामुळे लवकरच तात्पुरता खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्यात येईल अशी माहिती सावली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कटरे यांनी दिली.