Click Here...👇👇👇

चंद्रपुरात आंतरजातीय विवाह संपन्न झाला.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार पार्टी चंद्रपूर तर्फे येथील थ्रीटी बुद्ध विहार नॅशनल पार्क रमाबाई नगरात आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला यावेळी आयु. शंकर रमाकांत पांचाल व आयुष्यमती. शितल लक्ष्मण मोगरकर यांच्या विवाह बौद्ध पद्धतीने लग्न लावून देण्यात आला. याप्रसंगी आर.पी.आय. (आंबेडकर) च्या विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा सौ.सुप्रियाताई खाडे भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे विदर्भ संपर्क प्रमुख श्री. शेखर तावडे, जिल्हाध्यक्ष श्री. डी एस माथने साहेब, श्रीमती. कविता महाजन, सुधाताई चहारे, सीमा डोंगरे, शर्मिला विश्वास, उपस्थित होते.

वधूवरांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी श्री. तपण कुमार रॉय यांनी शुभेच्छा दिल्या.