Top News

वैनगंगा नदीच्या दाबामुळे तालुक्यातील शेकडो एकर शेती पाण्याखाली.

मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान.
वाहतुकीचे अनेक मार्ग बंदः प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे . पाण्यामुळे नदी काठावरील छोटे मोठे नाले तुडुंब भरलेले असून पाण्याच्या वाढत्या दाबामुळे सावली तालुक्यातील शेकडो एकर शेतामध्ये पाणी आल्याने उभ्या डौलदार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सावली तालुक्यातील करोली , आकापूर , बोरमाळा , गेवरा , डोंगरगाव , निफंद्रा , विहिरगाव , निमगाव , चीचबोडी , दाबगाव , थेरगाव , व्याहाड , वाघोली , सामदा , सोनापूर , निलसनी पेठगाव , हरांबा , डोनाळा , कढोली , लोंढोली , साखरी , सिर्शी , जीबगाव , उसेगाव , रुद्रापूर , कवठी , पारडी , हरणघाट ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर आहे. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमानात शेतजमिनी सुद्धा आहेत. त्या सर्व जमिनीमध्ये धान , कापूस , सोयाबीन चे उत्पादन घेण्यासाठी लागवड केलेली आहे. परंतु गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्यामुळे नदीला पूर आले आणि नाले भरून आले. नाल्या लगतच्या आणि नदी लगतच्या जमिनीमध्ये पुराचे पाणी शिरून धान, कापूस , सोयाबीन बुडून गेल्यामुळे उभ्या पीकांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे . या वाढत्या पाण्यामुळे अनेक जवळील गावात पाणी घुसन्याची शक्यता आहे. अनेक शेतात पाणी हा 4 ते 5 फूट पर्यंत जमा झालेला आहे. आजूबाजूच्या शेतातील खूप मोठे नुकसान झाले आहे. गोसिखुर्द धरणाचे सर्व गेट सुरू केल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही शेतकऱ्यांना घातक ठरली आहे. या आलेल्या सर्व पुराची सत्य परिस्थितीची माहिती प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांनी नायब तहसीलदार सावली यांना दिली व प्रत्यक्ष पुरपरिस्थितीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी याविषयी चर्चा केली. त्यामुळे प्रहार सेवक यांनी दिलेल्या माहितीमुळे पुराची पाहणी करण्यासाठी सावलीचे पि. एम. कावळे मंडल अधिकारी सावली, निलेश चुरे तलाठी जिबगांव, रमेश गीत्ते तलाठी हरांबा, प्रहार सेवक राकेश एम. गोलेपल्लीवार , क्रीष्णा कन्नाके शिपाई तलाठी कार्यालय जिबगांव यांनी जिबगाव येथिल पुराची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई देण्याविषयी सकारात्मक माहिती दिली. त्यामुळे तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे नजर ठेवून आहेत. तसेच आलेल्या पुरामुळे घाबरून जाऊ नये. तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने