कळमना येथील लसीकरण शिबिराला सुनील उरकूडे यांनी प्रत्येक्षात भेट देऊन मार्गदर्शन केले.
Bhairav Diwase. Aug 10, 2020
राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जनावरांवरिल संसर्ग रोग लंपि ने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे . ऐन कामाच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे. लम्पी हा रोग संसर्गजन्य असल्याने एकापासून अनेक जनावरांना होत आहे.
याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये करिता जिल्ह्यातील जनावरांवरिल वाढत असलेल्या लंपी रोगावर मात करण्यासाठी दहा दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण शिबिर राबवून त्याबाबतचा आढावा दररोज घेण्याचे निर्देश जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सोनवणे यांना जी. प. चंद्रपूर कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री सुनील उरकुडे यांनी दिले.
तसेच ग्रामपंचायत कळमना येथील लसीकरण शिबिराला प्रत्येक्षात भेट देऊन शिबिराची पाहणी केली व पशुधनावर आलेल्या संकटावर आपण नक्कीच मात करू असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.