Click Here...👇👇👇

बामनवाडा येथील जांगोदेवीच्या स्थळी आदिवासींची पूजा अर्चा.

Bhairav Diwase
जागतिक आदिवासी दिनी बामनवाडा येथील जांगोदेवीच्या स्थळी आदिवासींची पूजा अर्चा.
Bhairav Diwase. Aug 10, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथे जागतिक आदिवासी दिनी राजुरा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी जंगोदेवी व भिवसन देवाची पूजा अर्चा करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.


जंगोदेवी व भिवसन हे देव आदिवासींचे आराध्य दैवत असून आदिवासी बांधव जंगोदेवी व भिवसन देवाला मानतात आणि निसर्गाचे प्रतीक या देवांना मानतात. जंगोदेवी ची निशाणी तयार करतांना आदिवासी बांधव झाडाला न तोडता देवीची निशाणी त्या झाडातून कोरून काढतात यावरून आदिवासींची निसर्गाप्रती किती अभिमान व प्रेम आहे हे या परंपरेतून दिसून येते. आणि ही परंपरा आजही कायम आहे. 


या परंपरे चे जतन करण्यासाठी बामनवाडा येथील आदिवासी बांधव जंगोदेवीचे स्थळी जंगोदेवी व भिवसन देवाच्या निषानीची पुनर्स्थापना  केली. या वेळी सामजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके, गणेश कोडापे, मारोती टेकाम चित्रांगण कोवे, आडे सर, मारुबाई कुळसंगे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी covid -19 चे नियमावलीचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.