पिकाची नुकसान व जिवीत हानी होऊ नये. यासाठी लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त करावा:- विलास निखाडे ग्रामस्थ
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावात गेल्या काही दिवसांपासून जंगलातून आलेल्या माकडांनी धुमाकूळ मांडला असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील गेल्या दोन दिवसांपासून दहा ते पंधराच्या संख्येने माकडे येत आहेत. ते घराच्या छपरावर चढून छपरांचे नुकसान करीत आहेत. शेतातील कापुस, सोयाबीन तसेच अनेक पिकाची नुकसान करत आहेत. काही माकडे व्यक्ती वर हमल करु शकते. तसेच चेक आष्टा येथील ग्रामस्थांनाही त्रास देत माकडां आहे. त्यासाठी लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
माझ्या घराच्या छपरावर चढून माकडे छपरांचे नुकसान करीत आहेत. शेतातील कापुस पिकाची नुकसान करत आहेत. व लहान मुलांवर हमला करु शकते. या माकडामुळे आर्थिक नुकसान होत आहे. आणि जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.
श्री. विलास निखाडे
ग्रामस्थ चेक आष्टा