आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पा विराजमान.
Bhairav Diwase. Aug 22, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरीही आज गणेशजींचे आगमन झाले असून कोरोनाचे संकट पाहता अगदी साध्या पद्धतीने विधिवत रित्या त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे. यावेळी विघ्नहर्त्याला कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी घातले.
आज चंद्रपुरात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता अगदी सध्या पध्दतीने गणपती उत्सव पार पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणेशभक्तांणीही याला प्रतिसाद दिल्याचे आज दिसून येत आले. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकुटुंब नव्या पाहुण्याची पूजा अर्चना केली. यावेळी अगदी सध्या पद्धतीने हा सोहळा पार पाडण्यात आला. सध्या जगावर कोरोनाचे सावट आहे. दिवसागणिक कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जगावरील कोरोनाचे विघ्न दूर कर असे साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाला घातले.