Bhairav Diwase. Aug 20, 2020
(संग्रहित छायाचित्र)
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या खरारपेठ येथील युवकाचा खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२० ला सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
प्रणय भाऊजी तोरे खरारपेठ वय (२३) सोमवारपासून बेपत्ता होता.घरच्यांनी शोधा शोध केली अखेर काही पत्ता न लागल्याने मंगळवारी गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली.गोंडपीपरी पोलिसांनी मोबाईल लोकेशन च्या आधारावर शोध घेतला असता गोंडपीपरी साई नगरी जवळ असलेल्या स्वतःच्या शेतातील अंदाजी १२ फूट खोल खड्यात पडून प्रणय चा मृतदेह गुरुवारी दि.२० ला आढळला. मृतक प्रणय शेतात मोबाईल गुंडात प्लास्टिक मध्ये ठेवला होता. त्यामुळे आत्महत्या असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.त्याच्या मृत्यूने खरारपेठ गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.त्याच्या पच्यात आई,वडील,भाऊ वहिनी असा बराच आप्त परिवार आहे.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलिस करत करीत आहे.