(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- सौ सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने तसेच सेवा सप्ताह निमित्ताने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पोभुर्णाच्या वतीने १० हजार मास्क आणि ५ हजार डेटाँल साबण वाटप करण्यात आले. तसेच पूरग्रस्त जुनगावला ४५० धान्य किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सभापती कु. अल्काताई आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय मस्के, अमोल मोरे पांडुरंग पाल, राहुल पाल, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होत.