Top News

केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान विविध सेवाविभूमुख कार्य करून केला सेवा सप्ताहाच समारोप.


मानववादाचे प्रणेते पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षरोपन.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक, एकात्म मानववादाचे प्रणेते पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त घरावरती भाजपाचा ध्वज लावून वंदन.
Bhairav Diwase. Sep 25, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. राज्याचे माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी हा दिवस *सेवा सप्ताह* म्हणून राबविण्याचा निर्धार केलेला होता तोच धागा पकडून केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री.राहुलभाऊ संतोषवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध जनकल्याणकारी कार्य करण्यात आले. वृद्धांना चालण्याकरिता वाकिंग स्टिक काळी देण्यात आली, कोरोना महामारीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याकरिता मास्क चे वाटप करण्यात आले.

भाजपा युवा मोर्चा चे कार्यकर्ते श्री. अनुप श्रीकोंडावार यांच्या तर्फे सकाळी फिरायला जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना निकोप वाढीसाठी केसर युक्त दूध व बिस्केट वाटप, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री मा. हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत आरोग्य वर्धक ज्यूस चे वाटप, पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय च्या कोविड सेंटर ला फळ, ज्युस, बिस्केट, व पोषण आहाराचे वाटप, सौ. सपनाताई सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घनोटी तुकुम येथील भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते श्री. लक्ष्मण गव्हारे यांच्या तर्फे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण करून सेवा सप्ताह अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक, एकात्म मानववादाचे प्रणेते पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त घरावरती भाजपाचा ध्वज लावून वंदन करण्यात आले. मोदीजी च्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लावण्यात आले असे अनेक लोकाभिमुख कार्यक्रम मा. राहुल संतोषवार यांनी केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक लोककल्याणकारी कार्य केलेले असून त्यांची दूरदृष्टी नक्कीच समाजण्याजोगी आहे. या संपूर्ण सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने