चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी एकूण 262 बाधित.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली 3903.
Bhairav Diwase.    Sep 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- रविवारी एकूण 262 बाधित पुढे आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 38 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे.तर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोविड सेंटर समोर गोंधळ घातला. 

आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3903 झाली आहे. यापैकी 1850 बाधित बरे झाले आहेत तर 2007 जण उपचार घेत आहेत.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

प्रशासनाला सहकार्य करावे व सुचनाचे पालन करावे , सामाजिक अंतर राखून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.