(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील अनेक गावात मोबाईलचे नेटवर्क समस्या गंभीर झाली असून या समस्येकडे दूरध्वनी मनोरा उभारणी कंपन्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी वेगवेगळ्या कंपनीच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कधी कॉल ड्रॉप ची समस्या निर्माण होते तर कधी कॉल डिस्कनेक्ट ची समस्या निर्माण होते. वेळेवर संभाषण पूर्ण होत नाही. अति महत्त्वाच्या कामानिमित्त बोलत असताना कधी फोन वर बोलण्यामध्ये खंड पडत असतो.तर नेट स्पीड कमी असल्यामुळे एखादी माहिती व ऑनलाइन कामे करण्यास वेळ लागत असतो त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
ज्या गावात मनोरा उभा करण्यात आला त्याच गावात नेटवर्क चांगल्या प्रकारे मिळत असतो.सुरुवातील वेगवेगळे ऑफर देत व नेटवर्क चांगल्या प्रकारे देत असल्यामुळे अनेकांनी सिम पोर्ट करून घेतले.
परिसरात वोडाफोन, आयडिया, बीएसएनएल, जिओ, इत्यादी कंपन्यांचे टॉवर उभे असूनही जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात वारंवार मोबाईल नेटवर्क ची समस्या उद्भवत आहे.तर घरात असतांना मोबाइल ला पूर्ण नेटवर्क राहत नाही तर फोनवर बोलन्याकरीता घराबाहेर निघुन कॉल करावे लागत आहे.
या मोबाईल नेटवरच्या समस्यांसंदर्भात कंपन्यांनी दखल घेऊन त्वरित नेटवर्क ची समस्या दूर करावी अशी परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.