गट विकास अधिकारी, व तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवदेन.
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्यातिल ग्रामीण भागातील ४५ लाख कुटुंबाचा उपजीविकिचा आधारस्तंभ ठरलेल्या केंद्र पुरस्कृत उमेद अभियाणाच्या अमल बजावनित कुठलाही बदल करू नये तसेच चुकीचे आकलन करून कर्मचार्याच्या सेवचे खाजगीकरन करण्याचे षडयंत्र हानुन पाडन्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोम्भूर्णा मधुन ७०० तर महाराष्ट्रातून सुमारे ४ लक्ष पोस्ट कार्ड मा. मुख्यमंत्री याना पाठविन्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या गरीबी निर्मूलन धोरना अंतर्गत राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियानाची (उमेद) सन २०११ पासून यशस्वीपने अमलबजावनि केली जात आहे.लोकानी लोकांसाठी लोकसंस्था उभारून यामार्फत सामाजिक समावेशन करून शाश्वत उपजीविका बळकट करने हे त्यामागचे सूत्र आहे.
ग्रामीण भागातील एस. सी.,एस. टी. , तसेच दुर्बल शोषित, पीड़ित, वंचित घटकाना ग्रामसंघ, प्रभाग संघ, या मार्फत अल्प दरात उद्योगासाठी समुदाय गुंतवणूक निधि उपलब्ध करून त्यांचे व कुटुंबाचे उत्पन्न वाढवुन शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य या अभियाणाद्वारे सुरु आहे.
या अभियान ची व्याप्ति इतकी मोठी आहे की ग्रामीण भागातील लाइफ लाइन समजली जाणारी कृषि, पशु, व मत्स्य या तिनही घटकावर विशेष जोर देऊन यांचे उत्पन्न वाढ विन्यासठि अभियानातील कृषि सखी, पशुसखि, मंत्यसखि, व त्याणा तांत्रिक सहाय करणारे कृषि व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक , मत्स्य व्यवस्थापक, अविरत प्रयत्न करीत आहेत.अशातच अचानक १० सप्टेंबर २०२० रोजी एम.एस.आर.एल.एम.( मुंबई) चे मुख्य कार्यकारी अधिकारी यानी कत्रांटी कर्मचारि चे पुनर्नियुक्तीचे आदेश थांबव न्याचा जो आदेश दिला तो अतिशय दुर्दैवी आहे.तरी राज्याचे मुख्यमंत्री मा. ठाकरे साहेबानी स्वतः या प्रकरनात लक्ष घालून अभियान आहे त्या स्थितित कायम राहावे या करिता पोम्भूर्णा तालुक्यातिल महिलानी तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी मार्फत मुख्यमंत्री याना निवदेन देण्यात आले.