क्रिकेटचा बॅटने वार करून एकाची हत्या.

आलापल्ली येथील घटना.
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
आलापल्ली (गडचिरोली जिल्हा):- आलापल्ली येथील गोंडमोहल्यात आज दि.१४ सप्टेंबर रोज सायंकाळी ६ च्या सुमारास मृतक उमेश सिद्धू कोडापे वय २२ वर्ष याची क्रिकेट बॅटच्या सहाय्याने वार करून हत्या करण्यात आली. यातील आरोपी हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याचे नाव अद्याप कळले नसून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मृतक उमेश सिद्धू कोडापे यांनी आरोपी इसमामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला याबाबत बातमी प्रकशित होण्यापर्यंत कळू शकले नसून हत्या झाल्याच्या घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील घटनास्थळी पोहचून मृतक आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आरोपीस अटक करुन पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या