Top News

उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची माहिती नातलगांना देण्याची व्यवस्था उभारा:- आ. किशोर जोरगेवार

कोविड सेंटरमधील उपायोजनांचा घेतला आढावा, अनेक महत्वाच्या सुचना.
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगांमध्ये उपचाराबाबत संभ्रम आहेत. ते दुर करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सहानुभुतीपूर्वक वागणूक देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा, रुग्णांच्या नातलगांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपलब्ध करुन देणारी व्यवस्था उभी करत रुग्णांसह रुग्णांच्या नातलगांचेही समाधान करणारी सेवा या कोविड सेंटरच्या माध्यमातुन देण्यात यावी असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला दिले. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड – १९ बाबत बैठक घेत परिस्थिचा आढावा घेतला यावेळी त्यांनी कोविड सेंटरचीही पाहणी केली. यावेळी वैद्यकिय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद मोरे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा रक्त संक्रमन अधिकारी डॉ. अनंत हजारे यांच्यासह इतर डॉक्टर व अधिका-यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने