आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघटना चिमूर यांनी घेतला निर्णय.
Bhairav Diwase. Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे व वाढत असलेल्या प्रदूर्भावर नियंत्रण यावे म्हणुन चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये चिमूर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांचेशी चर्चा करून चिमूर येथील वैद्यकीय सेवा सोडुन सर्व दुकाने हे सकाळी ९ ते सुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील व शनिवार व रविवारी सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला.सदर निर्णय दिनांक १५/०९/२०२० पासून लागू होणार आहे.
या बैठकीला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया,चिमूर येथील उपविभागीय अधिकारी संपकाळ,तहसीलदार नागतीळक,ठाणेदार धुळे,संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी,चिमूर नगर परिषद नगराध्यक्ष गोपाल झाडे,डॉ.अगडे,चिमूर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद बारापत्रे उपस्थित होते