मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको:- भूमिपुत्र युवा ऐकता बहु. संस्था चंद्रपूर.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असे म्हणत आहे.माञ हे चुकीचे आहे,महाराष्ट्रात ऐकून १७१०००ओबीसी जागेचा बॅकलॉग  अजुनपर्यत महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेला नाही तसेच १८ जून१९९४ च्या परिपत्रका नुसार ओबीसीचे १९% असलेले आरक्षण महाराष्ट्रतील अनेक जिल्हात मिळालेले नाहीत.त्यात चंद्रपुर ११% यवतमाळ १४%,धुळे,नंदुरबार,नाशिक,रायगड,पालघर ९%आणि गडचिरोली ६%अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात विसंगती दिसुन येते ही विसंगती त्वरित दुर करण्यात यावी तसेच मराठा आरक्षणाला भूमिपुत्र संस्थेचा विरोध नाही माञ मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समावेश करु नये अशी भूमिपुत्र युवा ऐकता बहु. संस्था चंद्रपूर ची  मागणी आहे.तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने  जातनिहाय जनगणना करावी व नच्चीपन आयोगाचा अहवाल तंतोतंत स्वीकारावा असे  एका पञकाद्वारे भूमिपुत्र युवा ऐकता संस्थेने  म्हटले आहे.