(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येत असलेल्या रामपूर या गावातील वार्ड क्रमांक 1 मधील काही लोकांनी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांना संपर्क केला व दोन ते तीन महिन्यापासून त्यांच्या वॉर्डातील कच्चा रस्ता हा खराब असून ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत छोट्याशाच कामाकरिता दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले होत
तेव्हा सुरज ठाकरे यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क केला असता ग्रामपंचायतीने सदर रस्ता हा ठीक करण्याबाबत असमर्थता त्यांच्या एकंदर हालचाली व बोलण्यावरून दाखविली असता सूरज ठाकरे यांनी त्यांना सोमवार पर्यंतचा वेळ दिला होता परंतु ग्रामपंचायतीचे एकंदर बोलणे पाहता ग्रामपंचायत हा रस्ता ठीक करण्याच्या मनस्थिती मध्ये नाही असे समजल्यामुळे सुरज ठाकरे यांनी स्वखर्चातून आज हा रस्ता तात्पुरता डागडुजी करून दिला आहे.
यामुळे रस्त्या जरी अत्यंत छोटा असला व त्यामध्ये डागडुजी ज्या भागाला करायची होती तो भागही अत्यंत छोटा असला तरी सर्वत्र ग्रामपंचायतीच्या एकंदर वागणुकीवर व सरपंचाच्या एकंदर वागणुकीवर प्रश्नार्थक चिन्ह उभे झालेले असून प्रत्येक ठिकाणी अशा पद्धती चे कार्य करणारा नेता हवा अशी चर्चा संपूर्ण राजुरा क्षेत्रांमध्ये होत आहे व वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांनी सुरज ठाकरे यांचे आभार मानले व भविष्यातही अशाच पद्धतीची साथ सदैव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.