न प प्रशासनाचे दुर्लक्ष; ते नेमके चोर कोण नगरात चर्चा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- नगरातील ओला,सुका कचाऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली मात्र घनकचरा व्यवस्थापन केंद्रातून अनेक सामान चोरी केल्या जात असल्याची बाब नगरातील लोकांच्या चर्चे अंती समोर येत आहे त्यामुळे ते नेमके चोर कोण अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत मात्र अश्या गंभीर बाबीकडे नगर पंच्यायत विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते व्यवस्थापन केंद्रात ओला ,सुका कच-याची साठवणूक करण्यात येते , त्यानंतर सदर कच-याचे रोजंदारी कामगारांच्या माध्यमातून प्लास्टिक फ्रायबर, काच, काचेच्या बाटल , प्लास्टीक आदी अनेक टाकाऊ वस्तूं वेगवेगळ्या केल्या जातात सोबतच झाडांना कंपोस्ट खताची निर्मिती केल्या जातो, मात्र व्यवस्थापन केद्रात जमा झालेले प्लास्टीक व ईतर टाकाऊ सामान काही चोरट्यांनी सर्रास विकण्याचा सपाटा सुरू केला असल्याचे नगरातील लोकांच्या चर्चेंअंती समोर येत आहे, ते चोर मात्र नेमके कोण अश्याही चर्चा रंगु लागल्या आहेत मात्र चोरी केलेले सामान नगरातील एका भंगार व्यावसायिकांला विकल्या गेले तो भगार व्यावसायीक कोण आणि ते चोरटे कोण अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत , मात्र अशा बाबींकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
नगरात साचलेल्या ओला आणि सुका कचरा पासून घाणीचे साम्राज्य तयार होऊन याची मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये नगरातील जनतेचे आरोग्य नीट राहावे नगर स्वच्छ आणि सुंदर दिसावे आदी कारणास्तव गावातील केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी म्हणुन नगरपंचायत प्रशासनाने गेली दोन वर्षांपूर्वी नवीन बाजार ओटे परीसरालगत घनकचरा व्यवस्थापन केंद्राची निर्मिती केली , मागील दोन वर्षांपासून नगरातील केरकचरा, टाकाऊ सामान व्यवस्थापन केंद्रात जमा केली जात आहे,या घनकचरा ,टाकाऊ पदार्थांपासून कंपोस्ट खत ( गांडूळ खताची निर्मिती, झाडांना खत) तयार केले जाते , त्याचा उपयोग सुध्दा झाडांना , शेतीपिकाला होत असतो , सोबतच ईतर टाकाऊ सामान प्लास्टीक टीन टपर ही सामान न प च्या वतीने ठरवून दिलेल्या भंगार व्यवसाय कला विकल्या जाते यातून न प ला महसूल सुधा जमा होतो परंतु नगर पंच्यायात प्रशासन सदर समान विकाण्या आधीच काही चोरट्यांच्या माध्यमातून सामान विकण्याचा सपाटा केला जात आहे नगर पंचायत च्या माध्यमातून अशा टाकाऊ , निरुपयोगी सामान विकले जाऊन त्याचा आर्थीक लाभ नगरपंचायत ला होत असतो.
परंतु घनकचरा व्यवस्थापन केंद्रातुन अशा टाकाऊ सामानाची ( फ्रायबर वस्तू, प्लास्टीक,बाटल) आदीची सर्रास चोरी केली जात असल्याची चर्चा नगरातील जनतेत सुरू आहे , पण याकडे व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करणाऱ्या नगरपंचायत चे दुर्लक्ष होताणा दिसते, अशा बाबींकडे नगरपंचायतने लक्ष देऊन ते चोरी करणारे नेमके चोर कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे, यातुन नगरपंचायतचा एक प्रकारचा महसूल बुडत आहे ,जो की त्याचा लाभ नगरातील ईतर कांमाना होऊ शकतो , याकडे नगरपंचायत लक्ष देऊन अशा चोरट्यां च्या वेळीच मुसक्या आवरण्यात याव्या आशि मागणी जोर धरत आहे मात्र नगर पंच्यायत प्रशासन अश्या चोरट्यांवार आणि चोरीचा मालं घेणाऱ्या भंगार व्यवसाई कावर काय कारवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.