पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम.

Bhairav Diwase
जिल्हा परिषद चे सभापती मा. श्री. सुनीलभाऊ उरकुडे यांचा अनोखा उपक्रम.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस "सेवा दिवस" म्हणून साजरा.
Bhairav Diwase.    Sep 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व गोरगरीब, वंचित, दलित ,आदिवासी व शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस राजुरा तालुक्यातील प्रत्येक गावात सेवा दिवस म्हणून आज साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद चे सन्माणानिय सभापती श्री. सुनिलभाऊ उरकुडे यांनी  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  गावातील वयस्क म्हातारे लोकांना चालन्याकरिता वाकिंग स्टिक  काळी देण्यात आली.म्हातारपणी वाकिंग स्टिक  काळीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा प्रकारच्या लोकांना वाकिंग स्टिक  काळी चा आधार घेऊन चालता येईल या उद्देशाने  गावातील वृद्धांना वाकिंग स्टिक  काळी देण्यात आली सोबतच तालुक्यातील रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, ठिकठिकाणी वृक्षारोपण, लहान मुलांना खाऊ वितरण व कोरोना योद्धा असलेल्या अंगणवाडी सेविकाना मदतनीस व आशा वर्कर यांना साडी वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून मान मोदींजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला‌ त्याप्रसंगी या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सभापती सुनिल उरकुडे, भाजपा नेते सतीश धोटे, भाजपा नेते, वामण तुराणकर उपसरपंच नोकारी, विनायक देशमुख, डॉ कूळमेथे साहेब, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, युवा नेते गणेश रेकलवार, जितेंद्र देशकर भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, कैलास कालेकर, महेश रेगुंडवार, जनार्धन निकोडे, प्रशांत साळवे, संदीप मडावी, बबीता पारधी ग्रा.प.सदस्य, सौ. मनिषा मेंढे ग्रा.प.सदस्य, लताबाई पवार, आशाबाई नागोसे, किशोर भोयर, सतिश गीरमाजी, ललीत काटोले, दीगांबर चौधरी, तसेच प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.