(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- श्रमिक एल्गारच्या केंद्रीय समितीचे बैठकीत श्रमिक एल्गारच्या नवे अध्यक्ष म्हणून संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते प्रवीण चिचघरे यांची निवड करण्यात आली.
श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागेवर हंगामी अध्यक्ष म्हणून राजेश्वर सहारे यांची निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या संकट काळात लाॅकडाऊन असल्याने केंद्रीय कमिटीची मिटींग घेतली नव्हती. मात्र लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर ही बैठक घेण्यात आली त्यात संघटनेच्या रिक्त पदावर सर्वानुमते नवे पदाधिकारी निवडण्यात आले.
यात उपाध्यक्ष म्हणून घनश्याम मेश्राम, रवी शेरकी यांची तर महासचिव म्हणून अॅड. डॉ. कल्याण कुमार यांची निवड करण्यात आली.
श्रमिक एल्गार ची नवी पिढी, नव्या दमाने नव्या विचाराने आणि नव्या जोमाने कार्य करेल असा विश्वास श्रमिक एल्गारच्या माजी अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, राजेश्वर सहारे यांनी व्यक्त केले
बैठकीचे संचालन रवी नेताम आभार प्रदर्शन लोमेश मडावी यांनी केले