वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी धिरज बांबोडे यांची नियुक्ती.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी धिरज बांबोडे यांची नियुक्ती झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ़ बाळासाहेब आंबेडकर यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली
          चंद्रपूर जिल्ह्यातील कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख आहे व भारिप बहुजन महासंघ ग्राम शाखा , तालुका सदस्य , युवक आघाडी जिल्हा महासचिव , भारिप जिल्हा महासचिव असे अनेक पद होते व सामाजिक कार्य , आंदोलनमध्ये सक्रीय सहभाग व पक्ष कार्यात नेहमी सामन्य कार्यकर्ता म्हणून काम करीत , जनसामान्यांपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे याच सामाजिक कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी याची नियुक्ती केली आहे