कोरोना जागतिक "महामारी" की भ्रष्ट नेत्यांची "लुटमारी"?

Bhairav Diwase
ॲड पारोमिताताई गोस्वामी यांच उद्याला बारा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर लाक्षणीक उपोषण.
Bhairav Diwase.    Sep 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- आधी शासकीय आरोग्य यंत्रणेला निधी द्यायची नाही! सरकारी दवाखान्यात अंदाधुंदी निर्माण करायची.
कोरोना ने लोकांना शासकीय रुग्णालयात मरू द्यायचे.
लोकांचा रोष सरकारी रुग्णालयावर तयार करायचा.
त्यानंतर आपल्या भागीदारीत कंपनी तयार करून
या कंपनीचे खाजगी जम्बो कोविंड सेंटर सुरु करायचे.

      या कोविड सेंटरला परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक ते अधिकारी बदली करून आणायचे.
आणि कोरोणाच्या महामारीत स्वतःचे भले करायचे.
महाविकास आघाडीचा  महाभ्रष्टाचार?
आश्चर्य म्हणजे
विरोधी पक्षाचे नेते ही विचारीत नाही की, 
श्रीमंत असलेल्या पुणे जिल्ह्यात शासकीय जंबो कोविड रुग्णाल तर गरीब असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात खाजगी जम्बो कोवीड रुग्णालय का?

पश्चिम महाराष्ट्राला (पुणे) न्याय.
आणी विदर्भावर (चंद्रपूर) अन्याय.
संपणार नाही का?
आपल्या नेत्यात  ती धमक नाही की स्वतःचा धंदा वाढवायचा आहे? याविरोधात ॲड पारोमिताताई गोस्वामी उद्याला बारा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर लाक्षणीक उपोषणास बसणार आहेत