चंद्रपूर ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना शिवण क्लास प्रशिक्षण शिलाई मशिन पुरविणे व व्यवसायिक अर्थसहाय्य पुरविणे यांच्या साठी शिवणकला शाळेचे उद्घाटन


Bhairav Diwase.    Sep 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मारोडा ता. मूल जि. चंद्रपूर येथे जवाहरलाल नेहरू तकनीकी शिक्षा परिषद नवी दिल्ली अंतर्गत निती आयोग मंत्रालय मानव संसाधन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सिटिज़न डेवेलपमेंटस ऑर्गनाइज़ेशन व फाल्गुनी महिला व्यवसाय कार्यशाळा शेगाव तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना शिवण क्लास प्रशिक्षण शिलाई मशिन पुरविणे व व्यवसायिक अर्थसहाय्य पुरविणे. यांच्या साठी शिवणकला शाळेचे उद्घाटन करण्यात आले. आज दिनांक 21/9/2020 रोज सोमवार ला 03 वाजता पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक सौ पठान मॅाडम अध्यक्ष प्रभाग संघ व ग्राम संघ मारोडा तसेच संस्थेचे  अध्यक्ष श्री.किशोर जगताप सर, जयंत रामटेके सर, शिवण क्लास शाळेचे मॅाडम निराशाताई निमगडे, नीता मेकतीवार, पत्रकार संजय मेकर्तीवार, शिवणकला मधे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी उपस्थित होते व कार्यक्रमाचे संचालन सौ अर्चनाताई पेनुलवार एम सी आर पी मारोडा यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने