(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथील व्यापारी अजय माडूरवार यांच्या साई मशिनरी दूकानाला आज पहाटे आग लागली. या आगीत लाखो रूपयचा मालाचे नुकसान झाले.आग लागल्यानंतर तातडीन अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. यामुळ मोठा अनर्थ टळला.
आज पहाटे गोंडपिपरी येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.पुरवठा पुन्हा सूरळीत झाल्यनंतर साई मशिनरी या दुकानात स्पार्कींग झाल्याने आग लागली. अजय माडूरवार यांच्या दूकानावर निवासस्थान आहे.आगीची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले. राजूरा येथून अग्नीशामक दलाचे वाहन बोलविण्यात आले.
वाहन वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.या आगीत साधारणत लाखो रूपयाचे सामान जळल्याची माहिती अजय माडूरवार यांनी दिली.