तिन महीण्यापासून निराधारांना मानधन मिळाले नाही.

Bhairav Diwase


Bhairav Diwase.    Sep 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- म्हातारपणात अनेक वृध्दांसाठी शासनाची वृध्दापकाळ योजना जगण्याचे साधन ठरली. योजने अंतर्गत मिळणाऱ्या मानधनावर कसेबसे जिवन कंठणार्या वृध्दांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे. मागिल तिन महीण्याचे मानधन अद्यापही जमा न झाल्याने वृध्दांची घालमेल वाढली आहे.
कोरोनाचा संकटकाळात अनेक उद्योग,लघू व्यवसाय  बंद पडले.बेरोजगारीची समस्या वाढली असतांनाच शासनाचा योजनांनाही कोरोनाने ग्रहण लावले. निधी नसल्याचा कारणाने अनेक योजनांचा निधी थांबविला गेला आहे. याचा सर्वाधिक फटक निराधार, वृध्दांना बसत आहे. मागिल तिन महीण्यापासून वृध्दापकाळ योजनेचे मानधन जमा न झाल्यामुळे अनेक निराधार, वृध्दांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या वृध्दापकाळ, निराधार योजनेचा मानधनावरच अनेकांचे कसेबसे जगणे सूरू आहे. दरम्यान मानधन त्वरीत जमा करण्याची मागणी वृध्दांनी केली आहे.