स्व.पं. दिन दयाल उपाध्याय याची गडचांदूर भाजपाच्या वतीने उत्साहात जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 26, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
गडचांदूर:- स्व प दिन दयाल उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.ते प्रखर राष्ट्रवादी,एकात्मक मानव वादाचे प्रगतशील विचार जण माणसात रुजवणारे मग्न विचारवंत ,कुशल संघटक भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. भारत देश हा एक मजबूत व सशक्त देश बनावा असे त्यांना वाटप होते.अश्या या महान पुरुश्याची जयंती गडचांदूर शहरात भाजपा शहर कार्यालयात प्रभाग तीन व प्रभाग दोन नगरसेवकांच्या कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले. व त्यांच्या जयंती निमित्याने शहरातील जवळपास पन्नास कार्यकर्त्यानी स्वतःचे घरावर पक्ष्याचे ध्वज उभारले व काही गरजू लोकांना धान्य किट वितरित करण्यात आले सेवासप्ताह म्हणून कार्य चालू आहे.आजच्या या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, महेशजी शर्मा, शिवाजी सेलोकर, निलेश ताजने, नगर सेवक अरविंद डोहे, नगर सेवक रामसेवक मोरे, सत्यदेव शर्मा, राकेश अरोरा, साईनाथ पोतनूरवार, परशुराम मुसळे, विनोद कावटकर, सुनील जोगी, प्रकाश कटिस्कर, सौ विज्यालक्ष्मी डोहे, सौ रंजना मडावी, सौ सपना सेलोकर, आदी भाजपा कार्यकर्ते यांनी यांनी कोविट १९ च्या नियमाचे काटेकोर पालन करून कार्यक्रम यशस्वी पार पडला.