समाज कल्याण विभागाकडुन दिव्यांगाना उपयोगी साहित्य तथा धनादेशाचे वितरण.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- देशाचे यशस्वी पंतप्रधान, युगपुरुष, नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाच्या शुभपर्वावर समाज कल्याण विभाग जि. प. चंद्रपूर यांचेवतिने जिल्ह्यातील दिव्यांग बंधूभगिनींना उपयोगी साहित्याचे वाटप तथा धनादेशाचे वितरण जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांचेहस्ते आज सकाळी सामाजिक भवन जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पार पडले.
भारतीय समाजव्यवस्थेत दिव्यांगांकडे बघण्याचा जुना दृष्टीकोन हा विषमतावादी होता, त्यामुळे याला छेद देत दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांना जगण्यासाठी नवी उत्साहवर्धक आशा मिळावी यासाठी मा. मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकार नेहमी सकारात्मक पाऊल उचलित आहे. आज दिव्यांगांना सामाजिक जिवन जगतांना सर्व क्षेत्रात उचित स्थान मिळावे, त्यांच्यातिल कलागुणांचा सम्मान व्हावा, आणि एकूणचं त्यांना सहकार्याची उभारी देऊन स्वावलंबी करता यावे, यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सतत धडपड असते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पथ अंत्योदय या मार्गावर मार्गस्थ असतांना आपणासर्वांची जबाबदारी आहे की, दिव्यांगांसाठी सहकार्याचा हात पुढे करून त्यांच्या स्वावलंबी जिवनासाठी खारीचा वाटा द्यावा. मागील राज्य शासनात माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना उद्योगाभिमूख सक्षम करण्यासाठी त्याधर्तीवर अनेक यशस्वी योजना आणल्या, जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांना चारचाकी गाड्यांचे वितरण केले. आणि आज उद्भवलेल्या लाॅकडाऊन काळामध्ये ही त्यांनी दिव्यांगासाठी अनेक मानवतावादी कार्य केलेले आहे.
यासोबतचं समाज कल्याण विभागामार्फत समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित अशा सबंध घटकांसाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना, उपक्रम सुरू आहेत. परंतु गरज आहे ती त्यासंबंधी योग्य माहिती शेवटच्या घटकांपर्यंत, उपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची. आणि ते सत्कार्य येणार्या काळात आपणा सर्वांना मिळून करायचे आहे. त्या माध्यमातुन हीचं खरी मा. मोदींजींना वाढदिवसाची भेट ठरून सेवा सप्ताहाचे फलित ठरेल! असे प्रतिपादन जि. प. चे समाजकल्याण सभापती श्री. नागराज गेडाम यांनी केले.
यावेळी, जिल्हाभरातून उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांना धनादेश, ब्लँकेट, व्हीलचेअर, कुबडी, इ. उपयोगी साहित्याचे वाटप तर आंतरजातीय दिव्यांग-अव्यांग विवाह योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर लाभाचे धनादेश प्रमुख पाहुण्यांकरवी वितरित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून, जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले, समाजकल्याण अधिकारी जाधव साहेब, यांसह जिल्हाभरातील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.