विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले सहकार्य.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- भिसी येथील व परिसरातील सैन्य भरती व पोलीस भारतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मैदानाची अडचण होती धावण्याचा सराव व्यवस्थित होत नसल्याने ही बाब चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ दखल घेत भिसी येथील चौरस्ता येथे स्वखर्चाने मैदानावर ४०० मीटर चे ट्रक करून दिले.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ट्रक चे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी भाजपा नेते सचिन भाऊ गाडीवार,पंचायत समिती सदस्य प्रदीप भाऊ कामडी,भिसी आंबोली जिल्हा परिषद प्रमुख नितीनभाऊ गभणे,पंचायत सदस्य देवेंद्रभाऊ मुंगले,सुरेन्द्र घरत,रामू जाजू,विनोद खवसे,आकाश ढबाले,गणेश भुरके,पंकज गाडीवार,स्वप्निल काळे,प्रा.रंदये सर,बंटी सहारे,मेघराज सोनवाणे,श्रीकांत गिरडे,वैभव ठोंबरे,रोहन डुकरे उपस्थित होते.