चिमूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या पथकाद्वारे ठिकठिकाणी दंड वसुली.
Bhairav Diwase. Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सार्वजनिक ठिकानी नागरिक मास्क चा वापर करतांना दिसत नाही त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे त्यामुळे या परिस्थितीवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदेश पारीत केला की सार्वजनिक ठिकानी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर २०० रुपये दंड वसुल करून त्यांना मास्क वाटप करण्याचे काम चिमूर पंचायत समितीचे पथक करत आहे.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर, भिसी,आंबोली, चिचाळा(चौरस्ता) परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पथकाद्वारे २०० रुपये दंड वसूल करण्यात आला संबंधित ग्राम पंचायत क्षेत्रातील हदीमधील ठिकाणी दंडाची पावती देऊन वसुलीची रक्कम ग्राम पंचायत ला सुपूर्द करण्यात आली पथकाद्वारे नागरिकांना मास्क वापरण्याचे महत्व पटवून देण्यात आले.
चिमूर पंचायत समितीच्या पथकामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय पुरी, कृषी अधिकारी घनश्याम पसारे,शंकरपूर ग्राम पंचायत चे सचिव किरन गायकवाड, चिचाळा(शा)ग्राम पंचायत चे सचिव असून पी.डी.राऊत या पथकाला दंड वसुलीसाठी पोलीस विभागाने सहकार्य केले.