राजुऱ्यात शिवसेना महिला आघाडीच्या पंचायत समिती क्षेत्रानुसार नियुक्त्या.

Bhairav Diwase
जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, महिला संघटिका सरिताताई कुडे, नगरसेवक राजू डोहे, माजी उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांच्या पुढाकाराने शिवसेना राजुरा बळकट.
Bhairav Diwase.    Sep 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा शिवसेना महिला आघाडीच्या नियुक्त्या आज करण्यात आल्या. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना महिला आघाडीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 
यामध्ये दीपालीताई बकाने, महिला आघाडी उपाध्यक्ष राजुरा, प्रज्ञा देठे महिला विभाग प्रमुख राजुरा, सुरेखा तालांडे आदिवासी महिला आघाडी उपतालुका प्रमुख, सुनीता जामडाळे विभाग प्रमुख आर्वी, कलावती इंदूरवार विभाग प्रमुख पाचगाव यांचा समावेश आहे. येणाऱ्या काळात लवकरच राजुरा तालुका महिला आघाडीच्या प्रमुख पदाची सूत्र एका भक्कम व्यक्तीला सोपवू आश्या प्रकारची माहिती बबन उरकुडे यांनी दिले.
जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शनातून येणाऱ्या काळात शिवसेना तालुक्यात भक्कम होईल असे चित्र दिसत आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे निलेश गंपावार,ऊमेश गोरे,सुरेश बुटले,स्वपनिल मोहुर्ले,नबि खान पठान, मनोज करवटकर समिर शेख, वसिम शेख, बंटी मालेकर, रमेश झाडे आणि  सौआशाताई ऊरकुडे,वर्षाताई पनदिलवार, शकुन आगलावे, स्मिता आगलावे, असंख्य महिला आणि  शिवसैनिक उपस्थित होते.