दुशांत निमकर यांना "स्टेट ऑयकान रिसर्च अवार्ड" तर किशोर चलाख यांना "महाराष्ट्ररत्न मानवसेवा पुरस्कार" ने सन्मानित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- मानवसेवा विकास फॉउंडेशन,साप्ताहीक ग्रामवैभव, इंटरनॅशनल ह्युमन रिसर्च पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतर्फे दरवर्षी विविध मानवविकास पुरस्काराने राज्यातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तिचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
"मानवसेवा विकास फॉउंडेशन" या नोंदणीकृत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ वे अखिल भारतीय प्रतिभा सम्मेलन कोरोना महामारीमुळे समारंभ न करता घरपोच पुरस्कार पाठविण्यात येत आहे.सदर पुरस्कार व्यक्तिच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या शिक्षकास दिला जातो.
चंद्रपुर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करीत असलेल्या दोन्ही शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय व गौरवास्पद आहे.शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सदोदित प्रयत्नरत असतात.समाजातील वास्तव स्थितिवर काव्यलेखन करून समाजात प्रबोधन करण्याचे कार्य करीत असतात.विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यामुळे एकदरीत त्यांच्या कार्याची पावती म्हणून दुशांत निमकर यांना "स्टेट ऑयकान रिसर्च अवार्ड" या पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे तर किशोर चलाख सर यांना "महाराष्ट्ररत्न मानवसेवा पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कोरोनाचे प्रादुर्भाव अधिक असल्याने कार्यक्रम आयोजित न करता पुरस्काराचे आकर्षक सन्मानचिन्ह, अभिलेख स्वरूप मानपत्र, महापुरूषाचे जीवनचरित्रपर पुस्तक, शाल, श्रीफळ, स्मरनिका (विशेषांक) घरपोच पाठविण्यात येणार असल्याची माहिती नंदकिशोर पाटील अध्यक्ष निवड समिती यांनी दिली आहे.