जिल्हा प्रशासनाच मात्र दुर्लक्ष.
Bhairav Diwase. Sep 17, 2020
बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे दिनांक ११/०९/२०२० रोजी आरोग्य विभागाकडून फुले/आंबेडकर सामाजिक भवनात कोठारी येथील व्यापाऱ्यांची कोरोना ऑंटीजन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये ५ व्यापारी कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव निघाले. त्यांना पुढील उपचाराकरिता आयसोलेशन वाट सैनिकी विद्यालयात नेण्यात आले. पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व घरा बाजूच्या लोकांची कोरोना टेस्ट आत्तापर्यंत करण्यात आली नाही.
ग्रामपंचायत कोठारी आरोग्य विभाग पोलिस प्रशासन यांनी रुग्णांच्या घरासमोर दोरखंड बांधले. परंतु पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, यांचा पहारा लावण्यात आलेला नाही. नियमानुसार रुग्णांचे नातेवाईक पुढील १४ दिवस त्यांचा इतर कुणाशी संपर्क येऊ नये, याकरिता प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येतो. कोठारी येथे यापूर्वी ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्या घरापुढे व पोलिसांचा पहारा लावण्यात आला होता. कोठारी येथील कंटेनमेंट झोनमधील रुग्णांचे नातेवाईक सरेआम गावात फिरत असून काही लोकांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने उघडून व्यापार करीत आहे. भविष्यात कुटुंबातील बाहेर फिरणाऱ्या नातेवाईक त्यामुळे गावात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता जबाबदार कोण? करिता कंटेनमेंट झोनची नियमावलीनुसार दोरखंड व पोलिसांचा पहारा लावण्यात यावा. अशी कोठारी नागरीकांची मागणी आहे. याकडे मात्र पालकमंत्री साहेब चंद्रपूर जिल्हा, माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर लक्ष देतील का? असा सवाल गावातील जनता करीत आहेत.
सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच सरकारच्या नियमांचे पालन करावे.
1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे.
2) पुरेसे गरम पाणी प्या.
3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या.
4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा.
5) पुरेशी झोप आणि आराम करा.
6) योगासन करा
7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा.
8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा.
9) सकाळी आणि संध्याकाळी चाला.
10) सहज पचले असा आहार घ्या.
11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा.