मुक्ती संग्रामात नालफडीच्या धोटे कुटुंबियांचे मोलाचे योगदान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 17, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- भारत देशाला 15 आगस्ट 1947 रोजी स्वतंत्र मिळाले परंतु जुनागड, जम्मू काश्मीर, व हैदराबाद या संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांना विरुद्ध सैनिकी कार्यवाही केली होती. याच माध्यमातून हैदराबाद येथील निजामाच्या रजा कारविरुद्ध राजुरा येथे सशस्त्र क्रांती झाली. व तब्बल एक वर्ष एक महिना दोन दिवसांनी प्रखर संघर्षानंतर राजुरा, कोरपना, जिवती हा भाग निजामाच्या अधिपत्याखाली स्वतंत्र झाला. याच संग्रामाला राजुरा मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम संबोधिले जाते.
      राजुरा मुक्ती संग्रामात नालफडी येथील धोटे कुटुंबियांचे मोलाचे व विशेष योगदान होते. एवढेच नव्हे तर नालफडी हे गाव मुक्ती संग्रामाचे केंद्र होते. स्वर्गीय आबाजी पाटील धोटे यांनी आपल्या युवक मित्रांच्या साथीने संघटन तयार करून निजामांच्या रजाकाराशी दोन दोन हात केले हा इतिहास आहे. त्यांनी अनेक रजाकारांना गोळ्या घालून यमसदनी पाठविले. विहारगाव रेल्वे स्थानकावर एक दिवशी सहा ते सात रजकाराचे मुडदे पाडून राजुरा क्रांतीला गती दिली होती. त्यांचा या आंदोलनास नालफडी येथे धोटे कुटुंबीयांनी भरपूर साथ दिली. या लढाईत नालफडी येथील धानोरकर नावाचा एक तरुण शहिद झाला होता. राजुरा मुक्ती आंदोलनास स्वर्गीय आबाजी धोटे यांचे चार्ली येथील खास मित्र सदाशिवराव ताजने यांच्या बॉम्ब पोहचवितांना स्फोट होऊन मृत्यू झाला. दरम्यान याच काळात नालफडी येथील देवाजी पाटील धोटे, राजेश्वर पाटील धोटे यांना निजाम सरकारने हैदराबाद येथे कैद करून ठेवले होते. या मुक्ती लढ्यात स्वर्गीय चिंतामण पाटील धोटे, स्वर्गीय मारोतराव धोटे, स्वर्गीय हरीशचंद्र पाटील धोटे, स्वर्गीय यादवराव धोटे व इतर धोटे कुटुंबीयांनी मोलाचे योगदान देऊन राजुरा, कोरपना, जिवती या भागातील निजामाची सत्ता संपवण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे नालफडी हे छोटेसे गाव मुक्ती संग्रामाचे केंद्रबिंदू ठरले होते. आज 17 सप्टेंबर मुक्तीदिन असल्याने संग्रामात शहिद झालेले धानोरकर, सदाशिव ताजने, तसेच तालुक्यातील सर्व शाहिदवीरांना नालफडी येथील धोटे कुटुंबीयांतर्फे मनाचा मुजरा व नवीन पिढी व समस्त राजुरा , जिवती, कोरपना येथील नागरिकांना राजुरा मुक्तीदिनाचा हार्दिक शुभेच्छा.

 निर्भय धोटे          वैभव धोटे
  राजुरा                  राजुरा