अज्ञात व्यक्तीवीरोधात गुन्हा दाखल, २१ हजार ५४१ रूपयांची खात्यामधून रक्कम केली लंपास.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
चामोर्शी:- आजच्या काळात डिजीटल ट्राझेक्शन करिता वेगवेगळे ॲप तयार करण्यात आले आहे परंतू त्या ॲपव्दारे फसवणुक केल्याच्या घटनाही उघडकीस येत आहे. अशीच घटना गडचिरोली जिल्ह्याती चामोर्शी तालुक्यातील एका इसमासोबत घडलेली आहे. त्याच्या खात्यातून तब्बल २१ हजार ५४१ रूपयांची रक्कम लंपास केली आहे. वृषाल दिलीप मानापूरे ( २६ ) रा . कोनसरी ता . चामोशी जि . गडचिरोली असे फसवणुक करून लंपास करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, वृषाल मानापूरे हा शेती हा व्यवसाय करतो. तो १० सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास आपल्या खात्यामध्ये असलेली रक्कम तपासण्याकरीता गुगल पे ॲप उघडले असता. त्याला रिफंड हा पर्याय असल्याने त्याला खाली ओके चा पर्याय दिसला असता त्याने ओके च्या बटनावर क्लिक केले असता. खात्यावर असलेल्या रकमेतून १८ हजार ७५२ रूपये लंपास झाले. त्यानंतर पुन्हा गुगल पे वर होय चा पर्याय आला असता त्यास क्लिक केल्याने २ हजार ७८ ९ रूपये असा एकुण २१ हजार ५४१ रूपये खात्यातून लंपास झाले. याबाबत वृषाल मानापूरे यांनी आष्टी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आष्टी पोलीस करीत आहे.