खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही:- आ. सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Sep 21, 2020


चंद्रपूर:- भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. खडसे हे भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. "दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही," असं ते म्हणाले आहेत. 



       "एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. खडसे हे भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे.

संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, "मी एकनाथ खडसेंशी बोलणार आहे. आमच्या आधी त्यांनी पक्षासाठी भरपूर काम केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान असे विचार मनात आणू नका अशी विनंती आहे"