बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना.

Bhairav Diwase
पित्यानेच केला आपल्या दोन मुलींवरती अत्याचार.
Bhairav Diwase.   Sep 24, 2020
वर्धा:- वर्ध्यातील आर्वी तालुक्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या दोन मुलींवरती अत्याचार केला आहे. यातील एका मुलीला गर्भधारणा झाली आहे.
हा इसम आपल्या ३१ वर्षीय पत्नीसोबत दोन मुलींसह राहत होता. या मुलींचे वय हे १३ आणि १४ आहे. यातील एक मुलगी आपल्या आजीकडे सुट्टीला गेली असताना अचानक तिची प्रकृती बिघडली. आणि ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणाची विचारपूस करताना आपल्या वडिलांनी तिच्यासोबत केलेले हे कृत्य उघडकीस आले. यानंतर या प्रकाराची तक्रार ही नागपूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही मुलींनी सर्व हकिकत समोर आली.

या तापासामध्ये आर्वी पोलीसांनी पित्याला अटक केली आहे. या मुलीची पुढील वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे या करत आहे.