एकाच दिवशी डबल मर्डरने हादरले चंद्रपूर शहर.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील रयतवारी परिसरातील बीएमटी चौकातील एका युवकाचा जुन्या वादातून खून झाल्याची घटना दुपारी घडली. 

मृतक युवकाचे नाव करन केवट असून त्याचे वय 25 वर्ष आहे , हा युवक दुपारच्या सुमारास घरी असताना सरफराज शेख व त्याच्या साथीदाराने करन चा खून केला.

 मात्र हा वाद इथेच न थांबता मृतकांकडील एकाने आरोपीचा संशय असणाऱ्या एकाचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. दुपारीच । खून व सायंकाळी पुन्हा । खून शहर आज डबल मर्डरने हादरून गेले आहे. 

धारदार शास्त्राने करणच्या शरीरावर अनेक घाव केल्यामुळे व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचविले असता अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
 सदर घटना घडताच परिसरात प्रचंड तणावाची स्तिथी होती त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करा म्हणतं रामनगर पोलीस ठाण्यात घेराव करताच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.