Bhairav Diwase. Sep 24, 2020
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन 24 सप्टेंबर 2020 रोज गुरुवारला महाविद्यालयांमध्ये शासकीय नियमांचे पालन (फिजीकल डिस्टंसिंग) करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल गर्गेलवार सर, कार्यक्रमाचे सहअधिकारी प्राध्यापक संतोष कुमार शर्मा तसेच कार्यक्रमाचे सहअधिकारी प्राध्यापिका वर्षा शेवटे हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व समजून सांगताना राष्ट्रपिता महात्मा गांधी, कर्मयोगी गाडगे महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्याच प्रमाणे जगावर आलेल्या covid-19 या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सावध असावे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील सेवकांच्या माध्यमातून समाजामध्ये covid-19 बद्दल जनजागृती करण्याबद्दल आपले मत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अधिकारी अमोल गर्गेलवार आणि संतोष कुमार शर्मा सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि शैक्षणिक सत्र 2020-21 या सत्रा मधे रा. से. यो. मार्फत महाविद्यालयाने दत्तक घेतलेले गाव या ठिकाणी करावयाचे कार्य याची दिशा स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.