(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा येथे दिनांक 24 सप्टेंबर 2020 हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. टी.एफ. गुल्हाने होते, कार्यक्रमाचे आयोजक कार्यक्रम अधिकारी, डॉ. संघपाल नारनवरे यांनी प्रास्ताविक केले यामध्ये समाज उन्नतीमध्ये सहभाग घ्यावा असे सांगुन रा.से.यो. बाबत सविस्त्र माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गुल्हाने यांनी कर्मचाऱ्यांना रा.से.यो. च्या माध्यमातुन आपल्या सुप्त् गुणांचा वाव व्हावा व स्वत:ला परिस्थीतीनुसार निश्चित करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन असलेले डॉ. परमानंद बावनकुळे, सिनेट सदस्य्, गो.वि. गडचिरोली यांनी कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी प्रा. नितीन उपर्वट, डॉ. पुर्णिमा मेश्राम, ओमप्रकश सोनोने, प्रा. विजय बुधे व निखील राचलवार यांनी सोशल डिसटन्सींगचे पालन करुन शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यक्रम यशस्वी केला.