युवा सार्वजनिक मस्कऱ्या गणेश मंडळ मारोडा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मारोडा येथे दरवर्षी प्रसिध्द असलेल्या मस्कऱ्या गणेश यांचे विसर्जन पोलिस प्रशासनाच्या नियमानुसार करण्यात आला. मारोडा येथे एकूण 8 गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली. व 20 वर्षापासून परंपरा जोपासत असलेला वार्ड नंबर 4 युवा सार्वजनिक मस्कऱ्या गणेश मंडळ मारोडा यांनी दरवर्षी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांततेत विसर्जन करत असतो. यावर्षी देशात व राज्यात कोरोणा विषाणूंचा संसर्ग जोमाने वाढत आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्हात व मूल तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोरात पसरत आहे. आणि युवकांचा उत्सव असलेला गणेशोत्सव हा शांततेत पाळावा. असं मुल पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्व मूल तालुक्यातील गणेश मंडळांना सूचना दिल्या होत्या. व त्या सूचनेचा पालन करत युवा सार्वजनिक मस्कऱ्या गणेश मंडळ मारोडा गणेश स्थापना करण्यापासून तर विसर्जन होण्यापर्यंत कुठलीही गर्दी न करता. 10 दिवस नियम पाळला व आता विसर्जनाच्या दिवशीही तोंडाला मास्क लावून कुठलाही वाद्य न करता 5 ते 6 युवकांनी गणेश मुर्तीचे विसर्जन केले.