चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संतोष रावत.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 15, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाउनकर यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले परिणामी त्यांचे पद रिक्त झाले होते . या रिक्त पदासाठी आज दिनांक १५/०९/२०२० रोजी निवडणूक घेण्यात येणार होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २५ संचालक आहेत त्यापैकी मनोहर पाउनकर तुरुंगात आहेत तर एक संचालक चंद्रकांत गोहोकर विदेशात असल्याने आज एकूण २३ संचालक मतदान प्रक्रियेत सहभागी होणार होते.

बँकेचे एक संचालक संदीप गड्डमवार यांनी आधीच दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते परिणामी त्यांची अविरोध अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित झाले होते तर यावर आज शिक्कामोर्तब केले गेले व संतोष रावत बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.

संदीप गड्डमवार यांनी बँकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनोहर पाउनकर यांचेवर केला होता व याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली होती. दुसऱ्या प्रकरणात बँकेचे एक संचालक रवी शिंदे यांनी साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप मनोहर पाउनकर यांचेवर केला होता. व या प्रकरणी गुन्हा नोंद करुन पाउनकर यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संतोष रावत यांच्या निवडीचे चंद्रपूर जिल्ह्यात आणि विशेषतः मूल नगरीत कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.