निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू.
२१ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यातील १२ हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. परंतु कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूका घेण्याबाबत चाचपणी सुरु केली असून ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का? याबाबतचा अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवडणुका होतील का याकडे आता लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने सुरुवातील गावातीलच एका व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला कोर्टात आव्हान देण्यात आल्याने हा निर्णय रद्द करत शासकीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्यात आली आहे.