Bhairav Diwase. Sep 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- या तालुकास्तरावर अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालय आहे. मात्र येथील बहुतांश विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, भुमि अभिलेख, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक , उपकोषागार अधिकारी कार्यालय, नगरपंचायत
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, दूरसंचार विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय , औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलीस स्टेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी शासकीय कार्यालय सह अनेक निमशासकीय शाळा - महाविद्यालये , बँका येथील कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचांदूर, राजुरा, वणी,वरोरा , भद्रावती, बल्लारपूर, चंद्रपूर येथून नियमित अप डाऊन करत आहे. त्यामुळे अनेकदा बरेच अधिकारी कार्यालयात वेळेवर पोहोचत नाही. शिवाय कार्यालयीन वेळेच्या पूर्वीच निघून जातात. यात तालुक्यातील दूर अंतरावरून येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. शिवाय बऱ्याचदा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सतरा चकरा नागरिकांना माराव्या लागतात. यातील अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शासकीय सदनिका सुद्धा उपलब्ध आहे. तरी मात्र ते या ठिकाणी राहत नाही.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कोरपना येथे राहणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी होते आहे.