मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; दुबईवरून कॉल आल्यानंतर बंदोबस्तात वाढ.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
महाराष्ट्र:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची व मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून दिल्याची माहिती मिळत आहे. 


मुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर दुबई वरून एका अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारण्याची आणि मातोश्री निवास्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी फोन करणाऱ्याने अज्ञान व्यक्तीने दिली. दुबईहून या अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती येत आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मातोश्रीवर धमकीचा कॉल आला होता. त्याची चौकशी सुरू आहे, असे अनिल परब यांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, फोन करणारी अज्ञात व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.


दरम्यान, दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉलनंतर ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याआधी कोरोना व्हायरसमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस सुरक्षा कमी केली होती.